भगवान महावीर जयंती
महावीर हे जैन धर्मातील 24 वे तीर्थंकर समजले जातात. तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ होते. अडीच हजार वर्षांपूर्वी इसवी सन पूर्व 599 मध्ये वैशाली गणराज्याच्या क्षत्रिय कुंडलपुर या ठिकाणी भगवान महावीर यांचा जन्म झाला. वर्धमान यांच्या आईचे नाव त्रिशला होते. तर वडिलांचे नाव सिद्धार्थ होते. भगवान महावीर यांचा जन्म बिहार मधील राजघराण्यात झाला होता. भगवान महावीरांना वर्धमान असे म्हटले जाते. भगवान महावीरांचे आयुष्य 72 वर्षांचे होते . साधारणतः 30 वर्षाचे कालावधीत त्यांनी आपल्या राज वैभवाचा त्याग करून विरक्त जीवन जगले. त्यांनी संन्यास घेतला. आत्म कल्याणाचा मार्ग पत्करला. कठीण तपस्या केल्यानंतर त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. समवशरण ज्ञान त्यांनी प्रसारित केले. पावापुरी याठिकाणी त्यांचे निर्याण झाले. भगवान महावीरांना वीरा,अतिवीरा, वर्धमान, सन्मती नयपुत्त, कश्यप, केवल अशा विविध नावांनी ओळखले जाते.