पोस्ट्स

आंबेडकर जयंती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

डॉ.. बाबासाहेब आंबेडकर

                  दलितांचे कैवारी,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे 14 एप्रिल 1891 रोजी झाला . त्यांचे वडील सैन्यामध्ये सुभेदार पदावर होते .ते शिस्तीचे अतिशय भोक्ते होते. त्यांनी भीमरावांना शिस्तीचे धडे दिले.  आपल्या मुलांनी शिकावं आणि मोठं व्हावं अशी त्यांची इच्छा होती. आईचे छत्र लहानपणीच हरपले होते.       डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव 'भीमराव रामजी आंबेडकर'  असे  होते. लहानपणापासूनच भिमराव अतिशय बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी होते. जिज्ञासा वृत्ती ज्ञान पिपासू पणा यामुळे त्यांनी भविष्यात प्रचंड शिक्षण घेतले. त्याकाळच्या पुराणमतवादी समाजात राहून आपले शिक्षण त्यांनी पूर्ण केले. शालेय शिक्षण  घेत असताना त्यांना समाजातील अनिष्ट रूढी परंपरा जातीभेदाचे वाईट व कटू अनुभव आले. परंतु खचून न जाता त्यांनी आपली शैक्षणिक वाटचाल खडतर असली तरी जिद्दीने सुरू ठेवली.           बडोद्याचे संस्थानिक महाराजा सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूर...