पोस्ट्स

उत्सव लेबलसह पोस्ट दाखवत आहे

होळी वर मराठीत निबंध

  होळी   होळी हा हिंदूंचा फार प्राचीन काळापासूनचा सण आहे. संपूर्ण भारतभर होळीचा सण अतिशय धुमधडाक्यात साजरा केला जातो.फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण असतो.या सणाला मराठी भाषेत शिमगा किंवा होळी पौर्णिमा असेसुद्धा म्हणतात. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजेच होळी धुळवड आणि रंगपंचमी काही ठिकाणी एकत्रितरीत्या साजरी केली जातात. फाल्गुनी पौर्णिमेपासून दोन, तीन किंवा पंचमी पर्यंत म्हणजेच पाच दिवस सुद्धा होळीचा सण अतिशय मजेमजेत साजरा होतो.             एकमेकाला गुलाल लावून, रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे,यातून बंधू भाव वाढतो आणि समाजातील विविध प्रकारची विषमता असूनही मानवतेला त्याचा फायदा होता.     गोवऱ्या, एरंड, ऊसाचे  वाढे,  केळीचे खुंट, गवत इत्यादी वस्तू वापरून  होळी तयार केली जाते. होळीमध्ये आपल्याला नको असलेल्या गोष्टी सुद्धा टाकतात. होळीमध्ये वाईट गोष्टींचे व विचारांचे  दहन करायचे असते. खोबऱ्याचे तुकडे यांची माळ होळीला अर्पण करतात.नारळ सुद्धा अर्पण करतात. मग गावातील एखाद्या आदरणीय व्यक्तीकडून तसेच महिल...