गुढीपाडवा निबंध व माहिती
हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा होय. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच नव्या वर्षाचा पहिला दिवस होय. या दिवशी महाराष्ट्रात हिंदू धर्मीय लोक गुढी उभारतात. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस असतो. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराच्या दारासमोर गुढी उभारली जाते. एका लांब बांबूच्या टोकाला रेशमी वस्त्र किंवा इतर एखादे रंगीत वस्त्र साखरेची गाठी, कडूनिंबाची पाने, चाफ्याच्या किंवा झेंडूच्या फुलांचा सुंदर हार बांधला जातो. त्यावर कलश ठेवला जातो कलशावर गंधाची पाच बोटे उमटवली जातात. गुढीची पूजा करून गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. गुढीला विजयाचे प्रतीक समजले जाते. याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी सीतेला पळवून नेणार्या लंकाधिपती रावणाचा वध केल्यानंतर पुष्पक विमानात बसून अयोध्या नगरी मध्ये प्रवेश केला होता. श्रीराम यांचे स्वागत करण्यासाठी अयोध्या नगरीने मोठी तयारी केली होती. सर्वत्र सडासंमार्जन करून गुढी उभारून आयोध्या नगरी सजवली होती आणि श्रीराम बंधू लक्ष्मण त्यांच्याबरोबर असल...